Nashik Crime: सातपूर दुहेरी खून खटल्यात एकालाच शिक्षा; भूषण लोंढेसह 7 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

Police escorting Bhushan Londhe and others from the District Sessions Court premises
Police escorting Bhushan Londhe and others from the District Sessions Court premisesesakal
Updated on

Nashik Crime : सराईत गुन्हेगार निखिल गवळे, अर्जून आव्हाड खून प्रकरणातील आठ आरोपींपैकी सात जणांची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर, वतन पवार यास अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.

गवळे व आव्हाड यांचा ३१ डिसेंबर २०१५ ला मध्यरात्रीच्या सुमारास खून करण्यात येऊन त्यांचे मृतदेह तोरंगण घाटात फेकून देण्यात आले होते. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (one convicted in Satpur double murder case 7 persons including Bhushan Londhe acquitted for lack of evidence Nashik Crime)

तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सनी उर्फ ललित विठ्ठलकर, निखिल निकुंभ, प्रिन्स सिंग, वतन पवार, किशोर गायकवाड, भूषण लोंढे, संदीप गांगुर्डे, आकाश मोहिते यांना अटक केली होती.

सदरील दुहेरी खून खटल्याचा निकाल बुधवारी (ता. २६) जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश जे. एम. दळवी यांनी देताना, परिस्थितीजन्य पुराव्याअभावी सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

तर, आरोपी वतन पवार यास आर्मॲक्टअन्वये तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी कामकाज पाहिले. तर, बचाव पक्षातर्फे ॲड. राहुल कासलीवाल, ॲड. एम. वाय. काळे, ॲड. सतीश वाणी, ॲड. अविनाश भिडे यांनी बाजू मांडली.

पोलिस तपासात त्रुटी

या दुहेरी खून प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदार नसताना, पोलिसांनी खुनाशी संबंधित परिस्थिती जन्य पुरावे उभे केले परंतु ते न्यायालयासमोर सिद्ध करू शकलेले नाहीत. पोलिसांच्या तपासात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने सरकार पक्षाला संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा सिद्ध करता आला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police escorting Bhushan Londhe and others from the District Sessions Court premises
Jalgaon Crime News : मुख्याध्यापकांच्या खात्यातून पावणेतीन लाख लंपास

पाच जण ७ वर्षे कोठडीत

या खटल्यातील आठ जणांपैकी तिघांना जामीन मिळालेला असल्याने ते बाहेरच होते. यात किशोर गायकवाड, संदीप गांगुर्डे, आकाश मोहिते यांचा समावेश होता. तर, सनी विठ्ठलकर, निखिल निकुंभ, प्रिन्स सिंग, वतन पवार, भूषण लोंढे हे मध्यवर्ती कारागृहातच होते.

तोबा गर्दी

न्यायालयाच्या आवारात दुहेरी खून खटल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. या खून खटल्यात आरपीआयचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे आरोपी होता.

त्यामुळे न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. भूषणची निर्दोष मुक्तता झाल्याची माहिती समजताच न्यायालयाच्या आवारात लोंढे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

"या खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने ज्या घटनाक्रम व त्यासंबंधित परिस्थितीजन्य बुहतांशी पुरावे पोलिसांकडून न्यायालयात सादर होणे अपेक्षित होते ते न झाल्याने त्याचा फायदा आरोपींना झाला." - ॲड. डॉ. सुधीर कोतवाल, सरकारी वकील

"या खटल्यात ठोस परिस्थिती पुराव्याअभावी सात जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. एकाला शिक्षा झाली तीही आर्मॲक्टअन्वये झालेली आहे."

- ॲड. राहुल कासलीवाल, बचाव पक्षाचे वकील

Police escorting Bhushan Londhe and others from the District Sessions Court premises
Ahmednagar Crime : जे तलवारीच्या साथीने जगतात ते तलवारीच्या पातीने मरतात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com