Nashik News: निफाड तालुक्यातील दीड हजार नागरिकांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण! झोपडपट्टीचा चेहरा-मोहरा बदलणार

रमाई आवास, शबरी आवास व मोदी आवास योजनामधून निफाड तालुक्यातील दीड हजार नागरिकांना स्वत:च्या टुमदार घराचे स्वप्न मागील वर्षभरात साकारले आहे.
Home Buying
Home Buyingesakal

पिंपळगाव बसवंत : श्रीमंतापासून मध्यवर्गीय ते गरीब कुटुंबाचे एक स्वप्न असते, ते म्हणजे हक्काचे घर. अन्न, वस्त्राबरोबरच निवाराही निकड कष्टकरी, मागास कुटुंबियांना अधिक जाणवते. गरिबांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावी ठरल्या आहेत.

रमाई आवास, शबरी आवास व मोदी आवास योजनामधून निफाड तालुक्यातील दीड हजार नागरिकांना स्वत:च्या टुमदार घराचे स्वप्न मागील वर्षभरात साकारले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील झोपडपट्टीचा चेहरा-मोहरा बदलणार असून, कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. (one half thousand citizens of Niphad taluka gets gharkul scheme nashik news)

प्रत्येक जण स्वप्नातील घर साकारण्यासाठी परिश्रम व मेहनत घेत असतो. मात्र, वाढती महागाई, हलाखीची परिस्थितीमुळे काबडकष्ट करणाऱ्यांचे घराचे स्वप्न हे स्वप्नच राहून जात होते, पण शासनाच्या घरकुल योजना झोपडपट्टीतील गरिबांसाठी वरदान ठरल्या आहेत.

रमाई आवास, पंतप्रधान आवास, शबरी आवास, मोदी आवास योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घरे बांधून दिली जात आहेत. निफाड तालुक्यात मागील वर्षात मोदी आवास योजनेची ७३५, तर शबरी आवास योजनतून ७२० घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

काही घरकुले पूर्ण होऊन लाभार्थ्यांनी घरकुलात गृह प्रवेश केला आहे. सुमारे २० कोटी रुपये निधी वर्षभरात घरकुलांसाठी निफाड तालुक्याला मिळाला आहे. रमाई आवास योजनेतून २०० घरकुले प्रशासकीय मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून मंजुरीसाठी पाठपुरावा केला जात आहे.

Home Buying
Nashik: गंगासागर तलावाला सौंदर्यीकरणातून मिळणार झळाळी! अमृत 2 योजनेंतर्गत भुजबळाच्या प्रयत्नांतून 5 कोटींचा प्रकल्प मंजूर

झोपडपट्टीच्या ठिकाणी टुमदार घरे...

झोपडपट्टीत कौलारू मातीच्या घरांमध्ये कसेबसे कुटुंब राहत होते. कौलारू दगड मातीची घर जाऊन आता त्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रिटची घरे उभी राहिली आहेत.

टुमदार सिमेंटच्या घरामुळे कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. अनुसूचित जाती, जमाती घटकांसाठी शासनाच्या घरकुल योजना घराचे स्वप्न सत्यात उतविणाऱ्या ठरत आहे. झोपडपट्टीचा बकालपणा दूर होत आहे.

गटविकास अधिकाऱ्यांचा पुढाकार

लाभार्थी अर्जदाराचा सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला, ग्रामपंचायतीचा उतारा, आधारकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, मनरेगा जॉबकार्ड, बँक पासबुक, फोटो, अशा कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर लाभार्थ्यांना पहिला हप्ता तत्काळ वर्ग होतो.

गरिबाचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील वारंवार ग्रामसेवकांच्या सभा घेऊन सूचना देत असतात. गटविकास अधिकाऱ्याच्या पुढाकाराने निफाड तालुक्यात गरिबांच्या घराचे स्वप्न साकार होत आहे.

"निफाड तालुक्यात अधिकाधिक लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहे. घरकुल योजनेमुळे गरिबांचे घराचे स्वप्न साकार होऊन जीवमान उंचावण्यास मदत होत आहे."

- महेश पाटील, गटविकास अधिकारी, निफाड

Home Buying
Gharkul Scheme News: सव्वा लाखांत घर बांधण्याची कसरत; बांधकामासाठी लागणारे साहित्य महागल्याचा परिणाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com