esakal | मालेगावात लुटीच्या उद्देशाने पिक-अपवर गोळीबार; एक जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

मालेगावात लुटीच्या उद्देशाने पिक-अपवर गोळीबार; एक जखमी

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील शहराजवळ रिजवान पार्क ते जनता सायजिंगदरम्यान शेळ्या घेऊन भरधाव जात असलेल्या पिक-अप (एमएच ४८, एजी ८७६१)ला लुटण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पिक-अपवर गोळीबार करीत गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (ता. ८) हा प्रकार घडला. यात जावीद रज्जाक खाटीक गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला. (One injured in shooting at Malegaon)


जामनेर, शेंदुर्णी येथील अलीम सलीम खाटीक, जावेद खाटीक, बरकत खाटीक, सुभाष धनगर, अजय गुजर व चालक नितीश रामा हे शेळ्यांची पिक-अप भरून कल्याण येथे विक्रीसाठी जात होते. शहराजवळ दुचाकीवर डोक्यास रुमाल बांधून आलेल्या तिघांनी भरधाव दुचाकी पिक-अपजवळ नेऊन चालकास ‘गाडी रोक, नहीं तो गोली मार देंगे’ असा दम दिला. मात्र चालकाने भरधाव पिक-अप पळविली. दम देऊन गाडी न थांबविल्याचा राग आल्याने तिघांपैकी एका संशयिताने पिक-अपच्या दिशेने गोळीबार केला. यात केबिनमधून डोकावून पाहणाऱ्या जावीद खाटीकला गोळी लागली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी अलीम खाटीक (वय ३८, रा. शेंदुर्णी, जामनेर) याच्या तक्रारीवरून पवारवाडी पोलिस ठाण्यात दुचाकीवरील तिघा संशयितांविरुद्ध ठार करण्याचा प्रयत्न, दमबाजी, शिवीगाळ व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे, पोलिस निरीक्षक व्ही. एल. भोये व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

(One injured in shooting at Malegaon)

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसीसमुळे ७० जणांचे मृत्यू

loading image