esakal | नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसीसमुळे ७० जणांचे मृत्यू; मृत्यूचे प्रमाण १० टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसीसमुळे ७० जणांचे मृत्यू

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी म्युकरमायकोसीसच्या आजाराचा प्रभाव मात्र कायम आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसीसमुळे आतापर्यत ७० जणांचे मृत्यू झाले असून, म्युकरमायकोसीसच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण दहा टक्के आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येचा मृत्युदर जेमतेम दोन टक्क्यांच्या आसपास असताना म्युकरमायकोसीचा आकडा मात्र अधिक आहे. (70 patients died due to mucormycosis in nashik district)


जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी यश येत आहे. कोरोना उच्चांक पातळीवर असताना ४१ टक्के पर्यत पोचलेला संसर्ग दर १.२२ टक्के इतका कमी झाला आहे. ग्रामीण भागात मात्र सिन्नर, निफाडसह काही टापूत कोरोनाचा प्रभाव कायम आहे. त्याचवेळी म्युकरमायकोसीसचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही.

५० टक्के मोठ्या शस्त्रक्रिया

नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसीसमुळे आतापर्यंत ७०७ जणांना बाधा झाली. त्यापैकी ४३५ जणांवर शस्‍त्रक्रिया कराव्या लागल्या. शस्त्रक्रियेमुळे विविध प्रकारचे अवयव काढून टाकावे लागतात. मोठ्या शस्‍त्रक्रिया ४३५ झाल्या. साधारण एकूण रुग्णसंख्येच्या ५० टक्के जणावर मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, तर त्यातील ७० जणांचे मृत्यू झाले. म्हणजे या आजारात ५० टक्के रुग्णावर मोठ्या शस्त्रक्रिया, तर दहा टक्के जणांचे मृत्यू झाले. म्‍युकरमायकोसीसवरील उपचारासाठी मिळणाऱ्या इंजेक्शनचा मात्र तुटवडा आहे. ४० हजारांच्या आसपास इंजेक्शनची गरज असताना १५ हजारांच्या आसपास इंजेक्शन मिळतात. ते वाढून मिळायला पाहिजे.

हेही वाचा: नाशिकमध्ये विवाहात मास्क, सॅनिटायझरसोबत थर्मामीटर सक्तीचे


सायनस विकार १९५
जबड्यांवर शस्त्रक्रिया १७७
दातांवर शस्त्रक्रिया ७१
डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ४०


जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर ४१ टक्क्यांहून जेमतेम १.२२ पर्यंत कमी करण्यात यश आले आहे. मात्र, म्युकरमायकोसीसच्या आजाराचा प्रादुर्भाव कायम आहे. म्युकरमायकोसीसमुळे विविध अवयव काढून टाकण्याच्या घटना आणि त्यातून मृत्यूची टक्केवारी दहा टक्के आहे.
- छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक जिल्हा

(70 patients died due to mucormycosis in nashik district)

हेही वाचा: नाशिकमध्ये तुटवड्यामुळे सार्वजनिक लसीकरण ठप्प

loading image