Nashik Crime News : जेजुरकर मळा- टाकळी रोडवर एकाचा खून

Police investigation
Police investigation esakal

Nashik Crime News : आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील जेजुरकर मळा - टाकळी रोडवर एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. तीन ते चार संशयितानी तीक्ष्ण हत्याराने खून केल्याचा संशय पोलिसानी व्यक्त केला आहे.या संशयिताच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना केली आहेत. (One killed on Jejurkar Mala Takli Road Nashik Crime News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Police investigation
Jalgaon Crime News : महिलेवर अत्याचारप्रकरणी 10 वर्षे शिक्षा

याबाबत अधिक माहिती अशी की, गुलाम रब्बानी या युवकाचे जेजुरकर मळा - टाकळी रोडवर पंक्चरचे दुकान आहे. शनिवार (ता.२८) रोजी रात्री सव्वा आठ च्यां सुमारास नित्यक्रमाने पंक्चरचे दुकानावर असताना तीन ते चार संशयितांनी गुलाम यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त परिमंडळ १ किरण चव्हाण, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे, सहायक पोलिस आयुक्त डॉ सिद्धेश्र्वर धुमाळ, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ आदीनी धाव घेतली. या प्रकरणी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Police investigation
Dhule Crime News : धुळ्यातून अल्पवयीन मुलींचे अपहरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com