Nashik News : मुंढेगाव शिवारात दुचाकी अपघात एक गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Accident news

Nashik News : मुंढेगाव शिवारात दुचाकी अपघात एक गंभीर जखमी

घोटी (जि. नाशिक) : मुंढेगाव ( ता. इगतपुरी ) शिवारात भरधाव अज्ञात वाहनाने शनिवार ( ता. ७ ) सायंकाळी ठोकर दिल्याने दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने जाणारे दोन युवक गंभीर जखमी झाले. (One seriously injured in two wheeler accident in Mundhegaon Shivara Nashik News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Jalgaon Crime News : पोलिस ठाण्यातून संशयित निसटले; शस्त्र, रॉडचा वापर, तरी हाणामारीच दाखल

याबाबत घोटी पोलीस ठाण्यातअज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समिनदार पुंडलिक गवळे ( वय २८ ) व सोमनाथ रामचंद्र बागुल ( वय ३७ ) हे दुचाकी ( क्रमांक एमएच, ०३ डीझेड. ६२२४ ) या वरून घोटीकडून नाशिकच्या दिशेने सायंकाळी जात असतांना मुंढेगाव शिवारातील दारणा नदीवरील पुलाजवळ अज्ञात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने ठोकर मारली.

यामध्ये दोघेही युवक जखमी झाले असून यामधील सोमनाथ बागुल डोक्याला गंभीर मार लागल्याने प्रथम जिल्हा रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर घटनेचा तपास हवालदार भास्कर महाले करत आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : 2 तडीपार गुंडांना अटक!

टॅग्स :BikesNashikaccident case