esakal | जिल्‍ह्यात दिवसभरात 1 हजार 73 पॉझिटिव्‍ह; 32 बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

जिल्‍ह्यात दिवसभरात 1 हजार 73 पॉझिटिव्‍ह; 32 बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने कोरानाची (coronavirus) लागण झालेल्‍या बाधितांची संख्या खालावते आहे. मंगळवारी (ता.18) दिवसभरात एक हजार 073 पॉझिटिव्‍ह आढळले. तर 680 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. 32 बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण (Active Patients) संख्येत 361 ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात 18 हजार 493 बाधितांवर उपचार सुरु आहेत. (one thousand 73 new corona patients found in Nashik district)

मंगळवारी (दि.18) नाशिक महापालिका क्षेत्रात 631, नाशिक ग्रामीणमध्ये 437 तर मालेगाव महापालिका क्षेत्रात पाच रुग्‍णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आला. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील 448, नाशिक ग्रामीणमधील 210, मालेगावच्‍या दोन तर जिल्‍हा बाहेरील वीस रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्‍यात तीन हजार 946 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील दोन हजार 301, नाशिक शहरातील एक हजार 236 तर मालेगावच्‍या 409 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार 394 संशयित दिवसभरात दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 183 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात पाच, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ, नाशिक ग्रामीणमध्ये 162, मालेगावला 35 रुग्‍णांचा समावेश आहे.

हेही वाचा: तौक्ते चक्रीवादळाचा द्राक्षवेलींना फटका; कोवळ्या फांद्या तुटल्या, शेतकरी चिंतेत

शहराभोवती पुन्‍हा कोरोनाचा विळखा

गेल्‍या काही दिवसांत कोरोना बळींमध्ये नाशिक ग्रामीण भागातील मृतांची संख्या अधिक राहात होती. परंतु परीस्‍थिती आटोक्‍यात येत असतांना, पुन्‍हा एकदा नाशिक शहराभोवती मृत्‍यूचा विळखा आला आहे. मंगळवारी झालेल्‍या मृतांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील सोळा मृतांचा समावेश आहे. यात अंबड, सातपूर, म्‍हसरुळ या भागातील मृतांचे प्रमाण अधिक आहे. तर नाशिक महापालिका क्षेत्राला लागून असलेल्‍या नाशिक तालुक्‍यातील मुंगसारा येथील 38 वर्षीय युवकासह 69 वर्षीय महिलेचा मृत्‍यू झाला आहे. तसेच पिंपळगाव गरुडेश्‍वर येथील एका मृताचा समावेश आहे. ग्रामीण भागात सिन्नर, निफाड, मालेगाव तालुक्‍यात प्रत्‍येकी दोन तसेच सटाणा, येवला, चांदवड, देवळा, सुरगाणा, इगतपुरी तालुक्‍यातील प्रत्‍येकी एकाचा समावेश आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रातही एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला.

(one thousand 73 new corona patients found in Nashik district)

हेही वाचा: जन्मदात्या पित्यानेच काढला मुलाचा काटा; पित्यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल

loading image