esakal | बळीराजाला दिलासा! बाजारात कांदा, लसणाचे भाव वधारले
sakal

बोलून बातमी शोधा

Onion and garlic

बळीराजाला दिलासा! बाजारात कांदा, लसणाचे भाव वधारले

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात मंगळवारी (ता. ४) झालेल्या लिलावात उन्हाळ कांद्याला एक हजार ४५०, तर लसणाला नऊ हजार रुपये कमाल बाजारभाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. (Onion and garlic prices rose In Market)

आवकही वाढली

पेठ रोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डातील कांदा-बटाटा विभागात कळवण, वणी, पिंपळवाडी, पाळे, मानूर, नांदुरी, सिन्नर, ठाणगाव, पाडळी, पेठ, हरसूल, करंजली, कोल्हार आदी भागांतून कांदा आवक होतो. मंगळवारी दुपारी कांदा लिलाव झाला. यात उन्हाळ कांद्यास किमान ६५०, कमाल एक हजार ४५०, तर सर्वसाधारण एक हजार १०० रुपये बाजारभाव मिळाला. लसणास किमान चार हजार ४७००, कमाल नऊ हजार, तर सर्वसाधारण सात हजार ५०० रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याची आवक तीन हजार ५२५ क्विंटल, लसूण ३३ क्विंटल आवक झाली.

हेही वाचा: मराठा आरक्षण देण्याची युक्ती चुकली, पाहा व्हिडिओ

हेही वाचा: रेमडेसिवीर इंजेक्शन न घेता 86 वर्षांच्या आजोबांनी हरविले कोरोनाला