
लासलगाव बाजार समितीत ऐतिहासिक पंरपरा मोडित
लासलगाव (जि. नाशिक) : आशिया खंडात अग्रेसर असलेल्या कांद्याच्या बाजारपेठेत ७५ वर्षांच्या इतिहासात गुरुवारी (ता. १०) अमावस्येच्या दिवशी कांद्याचे लिलाव करण्यात आले. या ऐतिहासिक घटनेनिमित्त आतषबाजी करण्यात आली. (onion auction was held in lasalgaon market committee with fireworks)
कांदा लिलावाच्या प्रारंभी लासलगाव दैवत भगरी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आतषबाजीत पहिल्या वाहनातील कांदा २,२५१ रुपये क्विंटल भावाने खरेदी केला गेला. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारतर्फे बाजार समितीची राज्य सरकार नियंत्रित बाजार समितीची स्थापना करण्यात आली होती. १ एप्रिल १९४७ मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला परंपरेनुसार कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात येत असे. गुरुवारी सहाशे वाहनातून १३ हजार क्विंटल आवक झाली असून, कमीत कमी भाव ७०० रुपये जास्तीत जास्त भाव २२५१ रुपये तर सरासरी भाव १८०० रुपये होता. या ऐतिहासिक निर्णयामुळे एका सत्रात १६८३३ क्विंटल कांद्याची आवक होऊन ३ कोटींची उलाढाल होऊन बाजार समितीला ३ लाख रुपयांचे उत्पन्न वाढले आहे. याचा शेतकरी बांधवांनाही फायदा होणार आहे.
हेही वाचा: वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची!- राऊत
महिन्याच्या दर आमवस्येला बाजार समितीत कांद्याचे लिलाव होत नव्हते. पण आज बाजार समितीच्या नवीन धोरणानुसार अमावस्येला पहिल्या माझ्या ट्रॅक्टरला २२५१ रुपये दर मिळाला. यामध्ये मी खूप समाधानी आहे.
- ज्ञानेश्वर गायकवाड, कांदा उत्पादक शेतकरी
(onion auction was held in lasalgaon market committee with fireworks)
Web Title: Onion Auction Was Held In Lasalgaon Market Committee With
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..