Latest Crime News | अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका; साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cattle rescued

Nashik Crime News : अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका; साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदोरी (जि. नाशिक) : नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा शहाजी उमाप यांनी स्विकारल्या नंतर अवैध धंद्याविरुद्ध दंड थोपटले असून कारवाई केल्याने अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहे. बुधवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास कत्तलीसाठी जाणाऱ्या १५ जनावरांना जीवदान दिले असून १४ लाख ५० हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Rescue of cattle going to illegal slaughter Assets worth fourteen half lakhs seized Nashik Latest Crime News)

सायखेडा पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला असून गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू,गुटखा,जुगाराविरुद्ध पाठोपाठ कारवाया केल्यात.त्यामुळेच सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

सायखेडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार चांदोरी शिवारातील शिंपी टाकळी फाटा परिसरातून कत्तलीसाठी जनावरे नेली जाणार असल्याची माहिती मिळाली.त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांनी एक टेम्पो व एक पीक अप यांचा पाठलाग करत त्यास पकडले असता निर्दयी पणे कोंबलेल्या १५ जनावरांची सुटका केली.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik Crime News : वणीत तरुणावर धारधार शस्त्राने वार

पोलिसांनी निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणारे संजय दिनकर चव्हाण, वय ४८ वर्ष रा. रसलपुर ता. निफाड जि. नाशिक ४०७ टेम्पो क्रमांक एमएच१७ बी डी २८८९ आरोपी दिपक शंकर गोसावी रा. शिवरे ता. निफाड यांचे मालकीचे ८ म्हशी (पारड्या) व २ रेडे (पार) असे एकूण १० जनावरे त्यांना हालचाल करता येणार नाही.

अशा पध्दतीने कोंबून भरून तसेच संशयित आरोपी अरविंद जगन्नाथ मराठे वय ४१ वर्ष, रा. दत्त मंदिराजवळ पिपळगाव रोड निफाड ता. निफाड जि. नाशिक त्याचे ताब्यातील बोलेरो पिकअप क्रमांक एम एच १५ इ जी ९५९३ यात संशयित आरोपी फकिर इब्राहीम पठाण रा. अहिल्यादेवी नगर निफाड ता. निफाड यांचे मालकीचे ०१ दुभती म्हैस व तिचे लहान पारड़ तसेच १ दुभती गाय व तिचे वासरु व एक रेडा अशी एकुण ५ जनावरे त्यांना हालचाल करता येणार नाही, अशा पध्दतीने कोंबुन भरुन विनापरवाना वाहतुक करतांना एकूण १४,५४,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शहाजी उमाप,उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पी.वाय कादरी. पो. हवालदार मनोज येशी,किरण ढेकळे,मोठाभाऊ जाधव पो.ना.पवन निकम पो.कॉन्स्टेबल प्रकाश वाकळे,जितेन्द्र मुकणे,तान्हाजी झुरडे आदींनी केली असून पुढील तपास चालू आहे.

हेही वाचा: Nashik News : सिडकोतील विविध प्रभागातील विविध उद्याने मोजताय अखेरची घटका!