Onion Export Duty Hike: कांद्याच्या दराला लागणार दृष्ट! 40 टक्के निर्यात शुल्कामुळे शेतकरी संतप्त

Duty on exports onion prices inflation farmer agriculture
Duty on exports onion prices inflation farmer agricultureesakal

Onion Export Duty Hike : एरवी मातीमोल बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा उन्हाळ कांदा यंदा काहीसा दिलासा देत होता, पण केंद्र शासनाच्या कृषीविरोधी धोरणाने पुन्हा एकदा कांदा उत्पादकांच्या मुळावर उठले आहे.

तब्बल ४० टक्के निर्यातशुल्क लावून केंद्र शासनाने अप्रत्यक्ष निर्यातबंदीच्या जोखंडात कांद्याला बांधले आहे.निर्यात शुल्काचा कोलदांडा आडवा आल्याने कांद्याच्या दरावर मोठा दबाव येण्याची भीती आहे. कांद्याच्या दरवाढीला करकचून ब्रेक तर लागणारच आहे. (Onion Export Duty Hike Farmers angry over 40 percent export duty nashik)

टोमॅटोच्या दरावर नेपाळमधून आयातीचा उपाय केंद्र शासनाने काढला. त्याचा परिणाम टोमॅटोचे दर ७० टक्क्यांनी घसरून ५०० रुपये क्रेट्‌सपर्यंत दर कोसळले. टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याची दरवाढ केंद्र शासनाच्या डोळ्यात खुपली आहे.

कांद्याचे पीक चार महिन्यांपूर्वी चाळीत साठविल्याने त्यात काही प्रमाणात घट झाली आहे. ती झळ सोसून शेतकरी आता काही समाधानकारक दर मिळू लागल्याने विक्रीसाठी आणत आहे.

शेतकऱ्यांना दर मिळत असताना, शहरातील ग्राहक डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने ४० टक्के निर्यातशुल्काचा फास लावून कांदा निर्यातीला मोठा अडथळा आणला आहे.

त्यामुळे सध्याच्या दरात कांदा निर्यात करण्यासाठी प्रतिक्विंटल ८०० रुपये खर्च येणार आहे. स्वाभाविक हा खर्च शेतकऱ्यांच्याच माथी पडणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Duty on exports onion prices inflation farmer agriculture
Nashik Onion Export Duty Hike: वणी येथे निर्यात शुल्क वाढीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रस्तारोको

रोजच्या ८ हजार क्विंटल कांदा निर्यातीला ब्रेक

पिंपळगाव बाजार समितीत जिल्ह्याभरातून दररोज २० हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. त्यातील आठ हजार क्विंटल कांदा रोज परदेशात निर्यात व्हायचा. त्यात बांग्लादेश, कोलंबो, दुबई, इंग्लड या देशात निर्यातीचा टक्का मोठा आहे.

४० टक्के निर्यातशुल्काचे ओझे कांद्यावर आल्याने कांदा निर्यातीला मोठा ब्रेक लागणार आहे. निर्यातीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. स्वाभाविक कांद्याचा पुरवठात देशांतर्गत वाढ होणार असून, बाजारभाव कोसळण्याची भीती आहे.

कांद्याच्या निर्यातीला व बाजारभावाला मोठा ब्रेक लागणार आहे. यावरून सोशल मीडियात केंद्र शासनाविरोधात रान उठविण्यात आले आहे.

‘टोमॅटोपाठोपाठ कांद्याचे दर पाडण्यासाठी तातडीने केलेल्या प्रयत्नाबद्दल मोदी सरकारचे जाहीर आभार’, असे उपोरोधिक टीपणी करणारे संदेश व्हायरल होत आहेत.

"मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांदा पिकवून दरवाढीच्या अपेक्षेने तो साठविला होता. नैसर्गिक आपत्तीने कमी उत्पादनांमुळे कांद्याच्या दरात तेजी आली होती. मात्र, ही तेजी टोमॅटोसारखीच केंद्र शासनाच्या डोळ्यात खुपली आहे. दर कोसळल्यास मनसेतर्फे मोठे आंदोलन उभारणार आहे." -प्रकाश गोसावी, जिल्हाध्यक्ष, मनसे

Duty on exports onion prices inflation farmer agriculture
Agitation For Onion : ठेवल्यास सडतो, अन् विकायला नेल्यास रडवतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com