कसबे सुकेणे- कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरत असताना स्वर्गीय शरद जोशीप्रणीत जिल्हा शेतकरी संघटनेने वेळोवेळी कांद्याच्या दराबाबत राज्य व केंद्राकडे कांदा निर्यातमूल्य २० टक्क्याने घटविण्याची मागणी केली होती. त्याची दखल केंद्र सरकारने घेत निर्यातमूल्य १ एप्रिलपासून घटवून शून्य करण्यात आल्याचा निर्णय नुकताच घेतला.