लासलगाव: श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्कात मोठा बदल करीत आजपासून हे शुल्क १० रुपये प्रतिकिलोवरून थेट ५० रुपये प्रतिकिलो केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे परदेशातून आयात होणारा कांदा महागणार असून, स्थानिक शेतकऱ्यांना तुलनेने चांगल्या भावाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादनाला बाजारपेठेत चालना मिळेल. तथापि, आयातीत कांदा महागल्याने एकूण पुरवठा घटू शकतो आणि त्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता असल्याने सामान्य ग्राहकांना महाग कांद्याचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.