Onion
sakal
नाशिक: कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादन खर्चापेक्षाही बाजारभाव कमी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा बाजारात विक्रीस आणू नये, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने नाफेड आणि एनसीसीएफ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.