esakal | कोरोनामुळे बाजार समित्या बंद, कांदा ऊत्पादक हवालदिल

बोलून बातमी शोधा

Farmers

कोरोनामुळे बाजार समित्या बंद, कांदा ऊत्पादक हवालदिल

sakal_logo
By
अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे कोरोनामुळे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहे, अशातच विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शुक्रवारी संध्याकाळी जोरदार हजेरी लावल्याने कांद्यासह शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

गेले दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण मुळे हवेत कमालीचा उकाडा असून पाऊस झाला नाही पण शुक्रवारी (दि. ३०) संध्याकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन लासलगावसह परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली दुपारपर्यंत कडक ऊन होते अचानक आलेल्या पावसाने बळीराजाचे काढलेला शेतीमाल छाकण्यासाठी एकच धावपळ उडाली. पण शेतात उभे असलेले पीक आणि ठिकठिकाणी सध्या कांद्याच्या पिकाची काढणी सुरू आहे. अश्यातच अचानक पाऊस सुरू झाल्याने तीन ते चार महिने पोटच्या मुलाप्रमाणे संभाळ केलेली पिके डोळ्यादेखत ओली झाल्याने मोठे नुकसान झाले आहे यामुळे आता कांद्याच्या पिकाचे प्रतवारी घसरणार असून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील होणार आहे. कोरोना महामारी सुरु असल्याने कांद्याला मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याचे बाजार भावात कमालीची दररोज घसरण होत आहे. त्यामुळे कुटुंब चालवावे कसे असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे. आता कांदा उत्पादक शेतकर्यांकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी मंगेश गवळी यांनी केली आहे.