Nashik Onion News : ‘उन्हाळ'ने लाल कांद्याला केले ‘ओव्हरटेक'; 50 ते दीडशेचा फरक

Millions lost in an hour after onion export was banned nashik marathi news
Millions lost in an hour after onion export was banned nashik marathi newsesakal

Nashik Onion News : दिवाळीनंतर बाजारात नवीन लाल कांदा ‘भाव' खात होता. तुलनेने उन्हाळ कांद्याचे भाव कमी होते. निर्यातबंदीनंतर सर्वाधिक फटका लाल कांद्याला बसला.

आठवड्यापासून लाल कांद्यापेक्षा उन्हाळ कांद्याचे भाव क्विटंलला पन्नास ते दीडशे रुपयांनी अधिक आहेत. काही ठिकाणी भाव स्थिर आहेत. (onion price difference of 50 to 150 nashik news)

भाववाढीची शक्यता खूपच कमी असल्याने व आणखी भाव कमी होऊ नयेत म्हणून शेतकरी नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. निर्यातबंदीनंतरही बाजारात कांद्याची आवक सुरू आहे. मात्र, भावातील घसरण कायम आहे. उन्हाळ कांदा संपत आला आहे. तालुक्यासह ‘कसमादे'मधील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा खरिपाचे उत्पन्न घटले.

शेतकऱ्यांनी बाजरी, मक्याचे पीक अर्धवट काढून टाकत लेट खरिपात कांदा लागवड केली. गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याला चांगले भाव मिळत होते. दिवाळीनंतर लाल कांदा चार हजार ३०० रुपये क्विटंल या भावापर्यंत पोहोचला होता. उन्हाळ कांद्याचे भाव क्विटंलला तीन हजार ८०० रुपयापर्यंत होते.

दोन्ही प्रकारच्या कांद्याचा सरासरी बाजारभाव तीन हजारांहून अधिक होता. भाव मिळत असल्याचे पाहून लेट खरिपातील कांद्याचे अधिक उत्पादन घेतले जात आहे. काही ठिकाणी कांदा काढणीला सुरवात झाली आहे. उन्हाळ कांद्याची लागवडीची अजूनही ‘धूम' सुरू आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीपासून ते एप्रिलपर्यंत लेट खरीप व उन्हाळ कांद्याची रेलचेल असेल.

केंद्र सरकारने ८ डिसेंबरला कांदा निर्यातबंदी केली. त्यानंतर भाव क्विटंलला एक ते दीड हजार रुपयांनी कोसळले. मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात शुक्रवारी (ता. १५) लाल कांद्याला दोन हजार २२१ रुपये, तर उन्हाळ कांद्याला दोन हजार १०० ते दोन हजार २२३ रुपये क्विटंल असा भाव मिळाला.

Millions lost in an hour after onion export was banned nashik marathi news
Nashik Onion News: लाल कांद्याच्या आवकमुळे उन्हाळ कांदा भावात घसरण

सोमवारी (ता. १८) लाल कांदा दोन हजार ते दोन हजार १७६, तर उन्हाळ कांदा दोन हजार १०० ते दोन हजार ३३५ रुपये क्विंटल या भावाने विकला गेला. आठवड्यापासून उन्हाळ कांद्याने लाल कांद्याला मागे टाकले आहे. उन्हाळ कांदा टिकाऊ आहे. नवीन लाल कांदा अधिक दिवस राखून ठेवता येत नाही.

कांद्याची वाढली आवक

मुंगसे बाजारात शुक्रवारी (ता. १५) एक हजार २९७, तर सोमवारी (ता. १८) एक हजार २६३ वाहनांतून कांदा विक्रीसाठी आला होता. दररोज पंधरा ते वीस हजार क्विटंलच्यादरम्यान कांदा विक्रीसाठी येत आहे. मंगळवारी (ता. १९) पहिल्या सत्रात ८०२ वाहनांतून कांदा विक्रीसाठी आला. लाल कांदा किमान आठशे, तर कमाल दोन हजार १८० रुपये क्विटंल या भावाने विक्री झाला.

सरासरी भाव एक हजार ८०० रुपये होता. उन्हाळ कांद्याचा किमान पाचशे व कमाल दोन हजार ३०० आणि सरासरी एक हजार ७०० ते एक हजार ९०० रुपयांदरम्यान क्विटंलचा भाव होता. कांदा निर्यातबंदी मागे घेतली जाण्याची शक्यता धूसर होत आहे. नवीन वर्षात कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणे अपेक्षित आहे. सध्या मिळत असलेला भाव आणखी कमी होण्याच्या भीतीने कांद्याची सर्वत्र आवक वाढली आहे.

Millions lost in an hour after onion export was banned nashik marathi news
Nashik Onion News: अवकाळीने कांदा लागवड लांबणीवर! शेतात अजूनही ओल, रोपे पिवळी पडली, दुष्टचक्र थांबेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com