लासलगाव- कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क हटवल्यानंतरही अपेक्षित बाजारभावात वाढ न झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मंगळवारी (ता. १) कांद्याच्या भावात दोनशे ते तीन हजार ३०० रुपयांची घसरण झाली. यामुळे सरासरी बाजारभाव एक हजार २०० ते एक हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.