सिन्नर- येथील बाजार समितीच्या मुख्य बाजारासह उपबाजारात कांद्याची आवक वाढत असून, दरात मात्र घसरण होत आहे. गेल्या दहा दिवसांत कांद्याच्या दरात १४९ रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली असून, आवक दोन हजार १५० क्विंटलने वाढली आहे. .कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून, शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. आवक वाढतच असल्याने त्यातून सध्या सावरण्याची चिन्हे अजून तरी नाहीत. त्यामुळे कांदा उत्पादकांत दिवसेंदिवस चिंता व्यक्त केली जात आहे..कांद्याला चांगला दर मिळत असताना त्यावर केंद्र सरकारने २० टक्के निर्यातशुल्क लावले. पर्यायाने बाजारभावात घसरण झाली. त्यातून सावरलेला कांदा सरासरी प्रतिकिलोचा दर २५ ते ३५ रुपयांच्या वर पोहोचला होता. आता आवक वाढू लागल्याने बाजारभाव कोसळले असून, जास्तीत जास्त १० ते १३ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. कांद्याच्या दरात अचानक झालेल्या पडझडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे..तालुक्यातील नांदूरशिंगोटे उपबाजारात ४ एप्रिलला कांद्याला जास्तीत जास्त एक हजार ५००, तर कमीत कमी ४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पाच हजार २८० रुपये क्विंटलची आवक झाली होती. सध्या जास्तीत जास्त एक हजार ३५१ रुपये, तर कमीत कमी ३०० रुपये दर मिळत आहे. मात्र आवक सात हजार ४३० क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. राज्यात रब्बी आणि उन्हाळ कांदा लागवडीचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ७० हजार हेक्टरने वाढले आहे. रब्बी हंगामात १०६ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साठवणूक क्षमता ३१ लाख टन असल्याने आवक टिकून राहणार आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात पडझड राहण्याचा अंदाज आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.