Onion
esakal
नाशिक: कांद्याचे भाव घसरलेले असताना राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी बफर स्टॉकचा कांदा बाजारात आणल्यामुळे दर आणखी घसरले आहेत. सरासरी १४०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव असताना बाजारात कांद्याचा ओघ वाढल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.