Onion Prices Drop : नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; दर ५९ टक्क्यांनी घसरले
Nashik Farmers Holding Nearly 48 Lakh Tons of Onion Stock : शेतकऱ्यांकडे साठवलेला सुमारे ४८ लाख टन कांदा बाजारात विक्रीस येत असल्याने दर वाढण्याची शक्यता कमी झाली आहे.
नाशिक: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे साठवलेला सुमारे ४८ लाख टन कांदा बाजारात विक्रीस येत असल्याने दर वाढण्याची शक्यता कमी झाली आहे. चालू हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५९ टक्के कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.