अवकाळीने कांदा गडगडला; दर घसरल्याने शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

onion
onionesakal

सटाणा (जि. नाशिक) : अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे सटाणा, देवळा, कळवण, उमराणे, मालेगाव या सर्व बाजार समित्यांमध्ये लाल व रांगडा कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा व्यापारी अवकाळीचा फायदा घेत मनमानी, लूट भावाने कांदा खरेदी करतात, असा शेतकऱ्यांचा आरोप असून, हे प्रकार न थांबल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विक्रीसाठी मोठ्याप्रमाणावर कांदा मार्केटमध्ये दाखल

कांद्याची आवक वाढली हे मान्य आहे. अवकाळी पावसामुळे लाल व रांगडा कांदा जास्त प्रमाणात बाजारात येतो या पावसामुळे कांद्याचे आवरण उतरून लवकर कांदा खराब होण्याची भीती असल्याने शेतकरीही जमेल त्या वाहनाने आपला माल लिलावासाठी आणतात. मात्र, शेतकऱ्यांच्या या असहाय्यतेचा फायदा व्यापारी वर्गाने उचलण्याचे सत्र थांबले पाहिजे. अद्याप उन्हाळ (रब्बी) कांद्याची आवक फारशी नसली तरी रांगडा व लाल कांद्याची आवक वाढल्याने कसमादे मधील विशेषतः सटाणा, देवळा, उमराणा, चांदवड येथील बाजार समित्यांमध्ये अवकाळीचा फटका बसलेला रांगडा व नाशिक गावठी कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येत आहे. मंगलवारी (ता. १५) सटाणा बाजार समितीत विंचूरे (ता. बागलाण) येथील प्रगतिशील शेतकरी व सरपंच रमेश वाघ यांनी सकाळच्या सत्रात लिलावासाठी आणलेल्या चांगल्या प्रतिच्या कांद्याला फक्त ५५५ रूपये प्रतिक्विंटल दर पुकारण्यात आला. रमेश वाघ व भाऊसाहेब गायकवाड यांच्यामार्फत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांना फोनवरून याबाबत कल्पना दिली. श्री. जाधव यांनी तोच माल देवळा बाजार समितीत विक्रीसाठी आणला असता ८०५ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यामुळे ही शेतकऱ्यांची लूट नाही का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.

onion
शालेय पोषण आहाराचा तांदूळ घोटाळा विधानसभेत

''कांदा उत्पादक शेतकऱ्यांची राजरोसपणे केलेली लुट असून, यावर कोणाचेही नियंत्रण राहीलेले नाही. मनमानी पद्धतीने कांदा खरेदी करण्याऱ्या व्यापाऱ्यांवर योग्य बंधने लादून कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.'' - कुबेर जाधव, संपर्क प्रमुख, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

onion
महाराष्ट्रामध्ये 229 हेक्टरवर अतिक्रमण; वनक्षेत्र अहवालात नोंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com