esakal | येवल्यात कांदा गडगडला! भावात रोजच घसरणीमुळे शेतकरी अडचणीत

बोलून बातमी शोधा

Onion prices fell in Yeola Nashik Marathi Agricultural news

लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांदा बाजारभावात देखील काही दिवसांपासून पडझड सुरूच असून, गुरुवारी (ता.८) येवल्यात कांदा गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली.

येवल्यात कांदा गडगडला! भावात रोजच घसरणीमुळे शेतकरी अडचणीत

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांदा बाजारभावात देखील काही दिवसांपासून पडझड सुरूच असून, गुरुवारी (ता.८) येवल्यात कांदा गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. येथे लाल कांद्याला सरासरी ६०० तर उन्हाळला सरासरी ७०० रुपयांचा भाव मिळाला. 

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी येथे लाल तसेच उन्हाळ कांदा किमान, कमाल व सरासरी बाजारभावात घसरण झाल्याने कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारून घ्यावा लागला. बुधवारी येवला बाजार समितीत लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान २०० ते कमाल ८९० (सरासरी ७५०) रुपये तर उन्हाळ कांद्यास प्रतिक्विंटल किमान २०० ते कमाल ९०० (सरासरी ७५०) रुपये असा बाजारभाव मिळाला होता.

गुरुवारी हे बाजारभाव आणखी खाली आले. गुरुवारी बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात ९०० रिक्षा पिकअपमधून सुमारे १० हजार क्विंटल कांदा आवक झाली. गुरुवारी येथे लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान १०० ते कमाल ७३५ (सरासरी ६००) रुपये तर उन्हाळ कांद्यास किमान १२५ ते कमाल ८७८ (सरासरी ७००) रुपये असा बाजारभाव मिळाला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी लाल कांदा किमान बाजारभावात ७५ ते १०० रुपयांनी, कमाल व सरासरी बाजारभावात १५० रुपयांनी घसरण झाली. उन्हाळ कांद्याचे दरदेखील बुधवारच्या तुलनेत गुरुवारी खाली आले. रोजच भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.  

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ