esakal | नाशिक : कांद्यांची आवक घटूनही बाजार भाव घसरलेलेच
sakal

बोलून बातमी शोधा

onion crop

नाशिक : कांद्यांची आवक घटूनही बाजार भाव घसरलेलेच

sakal_logo
By
अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : बदलत्या वातावरणामुळे चाळीतला साठवलेला कांदा सडण्यास सुरवात झाला असून वजनातही घट होत आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आवक घटूनही बाजार भाव घसरलेलेच असल्याचे दिसत आहे. सरासरी १५३० रुपये प्रति क्विंटलने कांदा विक्री होत असल्याचा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. कांदा निर्यात देशातून सुरू आहे मात्र भारताच्या तुलनेत स्पर्धक देशातून कमी दराने कांदा परदेशीय बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने भारताच्या कांद्याला फटका बसत आहे.

उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळेल या अपेक्षेने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठविला आहे. नाफेडने सुद्धा यंदा २ लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. मागील दोन वर्षांपासून कांदा ऐतिहासिक दराने विक्री झाला होता. मात्र यंदा इतर राज्यात मुबलक कांदा उत्पादीत झाल्याने नाशिकचा कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन पाणी काढत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची आवक कमी झाली आहे. तरीही दरात घसरण होत असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. एकीकडे साठवणूक काळात होत असलेले नुकसान व वजनात घट होत असताना दरातील घसरण मोठी डोकेदुखी ठरत आहे.

शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांतील कांदा दराचा अंदाज घेऊन कांदा साठवणूक करण्यावर भर दिला. आता आवक कमी होत असल्याने दरवाढीची अपेक्षा होती. मात्र ऑगस्टमध्ये आवक कमी होऊनही क्विंटलमागे सरासरी २०० ते ३०० रुपये घट झाली आहे.

हेही वाचा: नाशिक : गुजरात पोलिसांच्या 'त्या' कारवाईची अखेर उकल

हेही वाचा: आमदाराचा लाजीरवाणा रेल्वे प्रवास; सहप्रवाशालाही शिवीगाळ

loading image
go to top