Onion
sakal
नाशिक: राज्यातील कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये पसरलेली तीव्र नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काढलेल्या मोर्चानंतर राज्य सरकारने कांदाप्रश्नी मंगळवारी (ता. १६) तातडीची बैठक बोलावली आहे. कांद्याच्या दराबाबत काय तोडगा काढता येईल, याविषयी तज्ज्ञांची मते मागविण्यात आल्याचे विशेष सूत्रांनी सांगितले आहे.