लासलगाव- कांदा खरेदीतील लाचलुचपत व अन्य गैरव्यवहाराच्या तक्रारींवर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लक्ष केंद्रित झाले असून, खरेदी प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलली जाणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत केले.