लासलगाव- नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. २०२४-२५ हंगामातील उत्पादनाने ५९ लाख टनांचा आकडा गाठला असून, ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ६३ टक्के अधिक आहे. मात्र, बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष दिसून येतो. उत्पादन खर्चही निघालेला नाही. दुसरीकडे कांद्याचे निर्यातशुल्क घटविल्याचा काहीही परिणाम दिसून आलेला नाही.