ऑनलाइन वर्ग घ्यावे की कोविडचे काम करावे?

teachers
teachersesakal
Updated on

नाशिक : कोविडमुळे (covid19) वर्षभरात शाळांना मुकलेल्या विद्यार्थ्यांना (students) यावर्षी शाळांची घंटा वाजेल, अशी अपेक्षा होती. दुसरी लाट व संभावित तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याच्या शक्यतेने यावर्षीदेखील शाळांमध्ये जाता आले नाही. परंतु, ऑनलाइन वर्गांना मंगळवार (ता.१५)पासून सुरवात झाली. असे असले तरी महापालिकेच्या शाळांमधील बहुतांश विद्यार्थी या वर्गांनादेखील मुकले आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी कोविडच्या कामातून मुक्तता न दिल्याने शिक्षकांना त्यांचे मुळ काम करता आले नाही. (online-classes-or-covid-work Municipal-teachers-confusion-nashik-marathi-news

महापालिका शिक्षकांची कुचंबणा

आज पासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शासनाने ऑनलाइन वर्ग घेण्यास परवानगी दिली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शाळांना ऑनलाइन वर्गांना सुरवात केली. खासगी शैक्षणिक संस्थांनी पालकांच्या मोबाईलवर लिंक पाठवून शिक्षणाचा श्रीगणेशा केला. मात्र, महापालिकेच्या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नशिबात शाळेचा आजचा पहिला दिवस नव्हता. महापालिकेने पालिकेच्या ८१ शाळांमधील सर्वच शिक्षकांना कोविडच्या कामात गुंतविले आहे. कोरोनाचा जोर ओसरला तरी पालिकेच्या शिक्षकांची, मात्र कोरोनाच्या कामातून सुटका झालेली नाही. शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण घेण्याची विनवणी करण्यात आली, परंतु विभागीय अधिकाऱ्यांनी कोविडच्या कामातून सुटका नसल्याचे संदेश दिले. शिक्षकांनी जमेल तसे ऑनलाइन शिक्षण दिले, परंतु पूर्ण क्षमेतेने ऑनलाइन वर्ग सुरू झाले नाहीत.

teachers
नाशिकच्या 'बॉश' कंपनीतील चोरी प्रकरणी ५ संशयितांना अटक
teachers
नाशिकमध्ये शिवसेना, मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com