नाशिक: ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून शासनाची कोट्यवधी रुपयांची करचोरी केल्याप्रकरणी पुण्याच्या सेंट्रल ‘जीएसटी’च्या गुप्तचर पथकाने छापा टाकत सुमारे पाच कोटींची रोकड जप्त केली आहे. देवळालीगावात राबविण्यात आलेल्या या छाप्यानंतर संशयित युवकाला पथक पुण्यात चौकशीकामी घेऊन गेले.