ऑनलाइन डिलिव्हरीच्या सुविधेची ग्राहकांना अतिरिक्त किंमत

ऑनलाइन डिलिव्हरीच्या सुविधेची ग्राहकांना अतिरिक्त किंमत
Published on: 
ॲंकर शहर-जिल्हा पान चारसाठी ----------------------- (फोटो ‘एआय’ घ्यावा) --------- ऑनलाइन डिलिव्हरीची ग्राहकांना अतिरिक्त किंमत ----- प्लॅटफॉर्म, पॅकिंग शुल्कासह कराची भर; शंभराची ऑर्डर पोहोचते दीडशे रुपयांवर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ११ : घरबसल्या काही मिनिटांत खाद्यपदार्थ, किराणा, औषधे किंवा विविध वस्तू मागविण्याची सुविधा ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे सहज उपलब्ध झाली आहे. मात्र, या सुविधेची सोय घेताना ग्राहकांना अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. वस्तूची मूळ किंमत कमी असली, तरी डिलिव्हरी, प्लॅटफॉर्म व पॅकिंगचे शुल्कासह करामुळे अंतिम बिलात लक्षणीय वाढ होत आहे. ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविताना ग्राहकाला सुरुवातीला दिसणारी किंमत व प्रत्यक्ष देय रक्कम यात मोठी तफावत दिसते. उदाहरणार्थ १०० रुपये किमतीच्या खाद्यपदार्थांवर विविध शुल्कांची भर पडल्याने अंतिम बिल १४० ते १५० रुपये किंवा त्याहून अधिक होऊ शकते. ...... लहान ऑर्डरवर अधिक भार कमी किमतीची ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना विविध शुल्कांचा भार अधिक जाणवतो. पन्नास ते १०० रुपयांच्या वस्तूंसाठीही ठराविक डिलिव्हरी किंवा प्लॅटफॉर्म शुल्क आकारले जात असल्याने वस्तूच्या मूळ किमतीच्या तुलनेत अतिरिक्त खर्चाचे प्रमाण वाढते. ....... फ्री डिलिव्हरीही महाग काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडून ‘फ्री डिलिव्हरी’चे आकर्षण दिले जाते. मात्र, डिलिव्हरी शुल्क नसले तरी प्लॅटफॉर्म किंवा इतर शुल्क आकारले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी केवळ डिलिव्हरी शुल्काकडे न पाहता पेमेंटपूर्वी अंतिम बिलातील सर्व शुल्क तपासणे आवश्यक आहे. ...... ऑनलाइनचे दर अधिक काही वेळा हॉटेल किंवा दुकानातील प्रत्यक्ष दर व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील दरातही फरक असतो. त्यात विविध शुल्कांची भर पडल्याने प्रत्यक्ष दुकानातून किंवा हॉटेलमधून खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन ऑर्डरसाठी ग्राहकाला अधिक पैसे मोजावे लागतात. ....... व्यावसायिकांवरही भार ऑनलाइन डिलिव्हरीचा परिणाम केवळ ग्राहकांपुरता मर्यादित नाही. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मला कमिशन द्यावे लागते. त्यामुळे काही व्यावसायिक ऑनलाइन ऑर्डरसाठी वेगळे दर ठेवतात. ........ बिल तपासणे गरजेचे ऑनलाइन ऑर्डर करताना वस्तूची मूळ किंमत, डिलिव्हरी शुल्क, प्लॅटफॉर्म फी, पॅकिंग शुल्क व कर यांची माहिती तपासणे आवश्यक आहे. ऑर्डर निश्चित करण्यापूर्वी अंतिम देय रक्कम किती आहे, हे पाहावे. ....... कोट ऑनलाइन ऑर्डर करताना वस्तूची किंमत कमी दिसते. मात्र, डिलिव्हरी, प्लॅटफॉर्म व इतर शुल्कांची भर पडल्यानंतर अंतिम बिल वाढते. विशेषतः कमी किमतीच्या ऑर्डरसाठी हा अतिरिक्त खर्च अधिक जाणवतो. -कुणाल देशमुख, ग्राहक, जळगाव. ...... कोट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर मिळाल्यानंतर त्यावर कमिशन व इतर खर्च द्यावे लागतात. त्यामुळे ऑनलाइन विक्रीतील दर व हॉटेलमधील प्रत्यक्ष दरात काही प्रमाणात फरक ठेवावा लागतो. - एक हॉटेल व्यावसायिक, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com