Nashik Rabi Season : जिल्ह्यात रब्बीच्या अवघ्या 17 टक्के पेरण्या

Rabi-sowing
Rabi-sowingesakal

नाशिक : राज्यासह जिल्ह्यात यंदा पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पिकांच्या सोंगणी आणि मळणीची कामे रेंगाळली. त्यामुळे डिसेंबर महिना उजाडून देखील रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग आलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १७.१८ टक्के इतकीच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. पुरेसा पाऊस झालेला असल्याने यंदा गव्हाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. (Only 17 percent sowing of rabi in district Nashik Rabi Season News)

यंदा ऑक्टोंबर महिन्यातही जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगफुटी झाली. परतीचा पाऊसही यंदा लांबला. अगदी दिवाळीपर्यंत जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने खरीप हंगाम संकटात सापडला. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत पावसाचे थैमान सुरूच होते. नोव्हेंबर महिन्यापर्यंत भात कापणी, मळणीची तसेच सोयाबीन काढणीचे कामे सुरू होती.

परिणामी खरिपाच्या पिकांमध्ये जमीन अडकली होती. यामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. डिसेंबर महिना सुरू झालेला असला तरी, पेरण्यांना वेग आलेला नाही. रब्बी हंगामासाठी जिल्हयात १ लाख १८ हजार ४४ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. यापैकी आतापर्यंत २० हजार २७५ हेक्टर (१७.१८ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. आतापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पेरणी गव्हाची झाली आहे.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

Rabi-sowing
BJP Mission 2024 : डॉ. भारती पवार यांची नाशिक लोकसभेत Entry

तर, ८ हजार १५५ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास चार सहकारी साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला असून यावर्षी ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत ८,४१३. २५ हेक्टर क्षेत्रावर नवीन उसाची लागवड झाली आहे. गतवर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत ८,१४१.६० हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. अनेक शेतकरी नगदी पिकांकडे वळाल्यामुळे जिल्ह्यात तेलबियाचे क्षेत्र घटले आहे.

आतापर्यंत झालेली पीकनिहाय पेरणी

ज्वारी ८५९.४५ हेक्टर, गहू ९ हजार १५०.२ हेक्टर, मका १ हजार ३९२ हेक्टर, हरभरा ८ हजार १५५.८५ हेक्टर, ऊस ८ हजार ४५५.२५ हेक्टर

Rabi-sowing
Nashik News : सातपुर त्र्यंबकरोडवरील जंगलात आढळला अनोळखी तरूणाचा गळफास अवस्थेतील मृतदेह!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com