Latest Marathi News | सातपुर त्र्यंबकरोडवरील जंगलात आढळला अनोळखी तरूणाचा गळफास अवस्थेतील मृतदेह! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death body

Nashik News : सातपुर त्र्यंबकरोडवरील जंगलात आढळला अनोळखी तरूणाचा गळफास अवस्थेतील मृतदेह!

सातपूर : त्र्यंबकेश्वर रोडवरील वासाळी लगतच्या केंद्रीय खादी ग्रामोद्योगच्या जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटना ही आत्महत्या की घातपात, याबाबत संशय निर्माण झाला आहे. (body of an unknown youth found in forest on Satpur Trimbak Road Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

भर जंगलात जाऊन एका झाडाच्या मोठ्या फांदीला साडीने गळफास लावून घेत अंदाजे पंधरा, वीस दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. झाडाला फक्त कपडे अन् मुंडकेच लटकलेल्या अवस्थेत दिसत होते. एका बाजूने केस, कानात बाळी घातलेली तर हातावर भरत असे गोंदलेले दिसत होते. शनिवारी (ता. ३) सकाळी वासाळीतील माजी सरपंच शांताराम चव्हाण यांनी सातपूर पोलिस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली.

वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण, महिला निरीक्षक अश्विनी पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, गणेश भामरे, तेजस मते, गायकवाड, मसाले, इंगळे आदींच्या पथकाने पंचनामा करीत घटनास्थळाची पाहणी केली. सातपूर पोलिस पथकाकडून या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची दुपारी उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू होते. घटनेचे वृत समजताच वासाळी, बेलगाव ढगा आदी परीसरातील तसेच नागरीकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.