Eastern Divisional Office and RRR center
Eastern Divisional Office and RRR center esakal

NMC RRR Centre News : समाजातील माणुसकी हरपली काय? दीड महिन्यात केवळ एकाची मदत..

NMC RRR Centre News : ‘नको असलेले ते द्या, हवे असलेल्यांनी ते घ्या’ अर्थात एखाद्याला ज्या वस्तूची आवश्यकता नाही. दुसऱ्याला मात्र त्याच वस्तूची गरज आहे. अशा गरजू नागरिकांपर्यंत त्या वस्तू पोचविण्यासाठी महापालिका पूर्व विभागीय कार्यालयात आरआरआर केंद्राची स्थापना करण्यात आली.

आवश्यकता नसलेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी आणून दिलेल्या वस्तूचे केंद्रात संकलन करून त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. (Only one citizen has collected some items in one and half months in nmc rrr centre nashik news)

त्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. गेल्या दीड महिन्यात केवळ एका नागरिकाने काही वस्तू जमा केल्या आहे. यातून समाजातील माणुसकी बदलत्या काळात कुठेतरी हरवली आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते आहे.

घरातील जुने कपडे, प्लॅस्टिकचे भांडी, खेळणी, पादत्राणे, वह्या-पुस्तके इतरही अनेक गोष्टी कचऱ्याच्या स्वरूपात पडून असतात. त्यातून मोठा कचरा निर्माण होत असतो. कालांतराने नागरिक घंटागाडीत कचऱ्याच्या स्वरूपात त्या वस्तू फेकून देत असतात. काही गरजू व्यक्ती अशी आहेत की त्यांना त्या वस्तूंसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. त्यानंतरही त्या वस्तू मिळतील याची शाश्वती त्यांना नसते.

कचरा देणाऱ्या अशा वस्तूंचा पुनर्वापर होऊन गरजूंची मदत व्हावी. या उद्देशाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्रीय गृह मंत्रालय आणि व्यवहारिक नागरिक मंत्रालय यांच्याकडून आरआरआर उपक्रमाची संकल्पना अस्तित्वात आणली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये त्यांचे केंद्र उभारून त्यात येणाऱ्या वस्तू गरजू गरिबांपर्यंत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्या वस्तू उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eastern Divisional Office and RRR center
Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये २४ प्रवाशांसह एसटी दरीत कोसळली! कंडक्टरचा व्हिडीओ आला समोर

शहरातील महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये आरआरआर केंद्र ३० मेस सर्व विभागीय कार्यालयांमध्ये कार्यरत करण्यात आले आहे. समाजातील सामाजिक भान असणारे तसेच, माणुसकी जपणारे व्यक्तींकडून केंद्रात अशा प्रकारच्या विविध वस्तू आणून देण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र केंद्राकडे सर्व स्तरातील नागरिकांकडून पाठ केल्याचे दिसून येत आहे.

जनजागृती करून देखील मदत नाहीच

पूर्व विभागीय कार्यालयाचा विचार करता ३० मे ते मंगळवारी (ता.११) असे सुमारे दीड महिन्यात केवळ एका व्यक्तीकडून वापरत नसलेले काही कपडे केंद्रात जमा करण्यात आले. त्या व्यतिरिक्त एकही व्यक्ती केंद्राकडे फिरकला नाही.

वस्तू जमा करण्यात येणाऱ्या व्यक्तीची माहिती असलेल्या रजिस्टरमध्ये केवळ त्या एका व्यक्तीचे नाव बघावयास मिळत आहे, अन्य रजिस्टर कोरे दिसत आहे. पूर्वी समाजात माणुसकी असल्याने प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या मदतीस धावत होता. सध्या जनजागृती करून देखील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीस येत नसल्याचे वास्तव यातून दिसून आले.

Eastern Divisional Office and RRR center
Nashik : बस दरीत कोसळून सप्तश्रृंगी घाटात भीषण अपघात; अजितदादांनी घेतली दखल, प्रशासनाला दिल्या 'या' सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com