Latest Marathi News | स्मशानवासींनी देवींचे राज्यातील एकमेव मंदिर नाशिकममध्ये! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik : Mata Melide Devi Mandir (Temple with Trident). In the second picture Mata Tara Devi Mandir (temple with flower arch)

Nashik News : स्मशानवासींनी देवींचे राज्यातील एकमेव मंदिर नाशिकममध्ये!

जुने नाशिक : माता तारादेवी आणि माता मेलडीदेवी यांचा शास्त्रात स्मशानवासींनी देवी, असा उल्लेख आहे. अशा या दोन्ही देवीं मंदिराचे शहराच्या मुख्य अमरधाममध्ये निर्माण करण्यात आले आहे. यातील मेलडीदेवी मंदिर संपूर्ण देशात केवळ गुजरातमध्ये, तर कलकत्ता येथील बिरबुम येथे माता तारादेवीचे मंदिर बघावयास मिळते. असे असले तरी राज्यात मात्र दोन्हींचे एकमेव मंदिर शहरातील मुख्य अमरधाममध्ये आहे.

मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्तजयंतीच्या शुभ मुहूर्तावर जुने नाशिक येथील शहराच्या मुख्य स्मशानभूमीत स्मशानवासीनी माता तारा देवी आणि माता मेलडी देवी मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन नागरिकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पुराणकथेनुसार मेलडी मातादेवी आणि माता तारादेवीचा वास स्मशानात असल्यामुळे यांना स्मशानवासीनी म्हणतात. (Only temple of goddess in state in Nashik Nashik News)

हेही वाचा: Nashik News : थंडी परतली, ओझर 4.9 अंशावर

गुजरातच्या स्मशानभुमीत माता मेलडी देवीचे मंदिर आहे तर कलकत्ता येथील बिरबुम येथे हिंदु स्मशनात माता तारादेवीचे एकमेव मंदिर आहे. राज्यात अशा दोन्ही देवी मंदिरांचे निर्माण होण्याचे भाग्य शहरास लाभले आहे. शहराच्या मुख्य अमरधाममध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

त्यामुळे अमरधाममधील दोन्ही मंदिर भारतातील दुसरे, तर राज्यातील पहिले ठरले आहे. अमरधाम स्मशानभूमीतील स्वयंम सेवक राजेंद्र गायकवाड, नीलेश काळे, शुभम हिरे, राजेंद्र रायजादे, विशाल विनायक मोरे, नितीन गायकवाड, ऋतिक जोगदंड, योगेश खैरनार, विनोद दोंदे यांच्यासह शारदा वल्लभ परिवाराकडुन पुढाकार घेत अमरधाममधील चबुतऱ्यावर मंदिरांचे उभारणी करून देविची प्रतिष्ठापना करण्यात आली. गोशाळेचेदेखील या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहे.

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

हेही वाचा: Sinnar Accident Case : कोणी एकुलते एक, तर कोणी आई- वडिलांचा आधार

अशी आहे आख्यायिका

मेलडी माता देवी आणि माता तारा देवीचे ८४ प्रकारच्या दानवांवर प्रभुत्व आहे. ज्या ठिकाणी या देवींचा वास असतो, त्या ठिकाणी दानवांचा वास राहत नाही. अशा आशयाचा पुराणात उल्लेख असल्याचे शारदा वल्लभ परिवारातर्फे सांगण्यात आले आहे.

दानपेटीस फाटा

देशातील गुजरात आणि कबराऊ मोगल या देवस्थानात दानपेटी दिसून येत नाही. त्याच धर्तीवर अमरधाममधील दोन्ही मंदिरात दानपेटी लावण्यात आलेली नाही. शिवाय कोणाकडूनही कुठल्याही प्रकारचे अर्थसहाय्य न घेता मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. यापुढेही मंदिरासाठी लागणारा सर्व प्रकारचा खर्च स्वयंसेवकांकडून तसेच शारदा परिवारातर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी दानपेटी दिसून येत नाही.

"नागरिकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर व्हावी. या उद्देशाने अमरधाममध्ये मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. नागरिक केव्हाही याठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेऊ शकणार आहे."

- धर्मेश मकवाना, सेवक

हेही वाचा: Ease of Living : भित्तिचित्रांतून नाशिक दर्शन; नाशिकची आगळीवेगळी ओळख!