वणी- येथे ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वीचे आवश्यक गटारींच्या स्वच्छतेचे काम हाती न घेतल्याने गुरुवारी (ता.८) झालेल्या अवकाळी पावसाने भूमिगत गटारातील पाणी व कचरा गावातील बाजारपेठ व देवी मंदिर चौकात आल्याने ग्रामपंचायतीच्या कारभार चव्हाट्यावर आला आहे. ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करत गटार आणि नालेसफाईची कामे तातडीने करण्याची मागणी केली आहे.