
Nashik : पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना फौजदार होण्याची संधी
नाशिक : राज्य सरकारने (State Government) पोलिस दलातील (Police Department) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, हवालदार, नाईक, शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर नियुक्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे. २५० पदांच्या भरतीसाठी ३० जुलैला अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे केंद्रावर मुख्य लेखी (Mains Written Exam) परीक्षा होईल. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ही पदे आरक्षणानुसार नव्हे, तर गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. (Opportunity for police personnel to become Police Sub Inspector Nashik News)
पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठीची पात्रता अशी : १ जानेवारी २०२२ रोजी सहायक उपनिरीक्षक, हवालदार, नाईक आणि पोलिस शिपाई म्हणून किमान सेवा-पदवीधर उमेदवारांसाठी ४ वर्षे, बारावी अथवा समतुल्य उत्तीर्णांसाठी ५ वर्षे, दहावी अथवा समतुल्य उत्तीर्णांसाठी ६ वर्षे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४०, तर इतरांसाठी ३५ वर्षे अशी असेल. मुख्य परीक्षा तीनशे गुणांची आणि शारीरिक चाचणी शंभर गुणांची असेल. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजले जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाद्वारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करता येईल. आजपासून २९ जूनला रात्री बाराला एक मिनीट कमी असेपर्यंत अर्ज करता येतील.
हेही वाचा: Breaking News : पंचवटीत अपघात; सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
मुख्य परीक्षेसाठी विधी (प्रमुख कायदे व इतर कायदे) हा विषय इंग्रजी आणि मराठी माध्यमातून असेल. दीडशे प्रश्नांसाठी तीनशे गुण असतील. दीड तास वेळ राहील. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असेल. परीक्षेसाठी मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी ५४४, तर इतरांसाठी ८४४ रुपये शुल्क असेल.
हेही वाचा: Nashik : प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांचा उद्या दीक्षांत सोहळा
Web Title: Opportunity For Police Personnel To Become Police Sub Inspector Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..