Latest Marathi News | प्रेम विवाहाला विरोध; मुलाची गोव्यात आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide Case

Nashik : प्रेम विवाहाला विरोध; मुलाची गोव्यात आत्महत्या

नाशिक : प्रेम विवाहाला विरोध केल्याने नाशिक येथील एका जोडप्याने गोवातील एका हॉटेलमध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात युवकाचा मृत्यू झाला असून, युवतीची प्रकृती स्थिर असून ती सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील गौरव यादव याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.

मात्र, या संबंधांना दोघांच्या घरच्यांकडून विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते गेल्या आठवड्यात रेल्वेने नाशिकहून गोव्याला पोचले. त्यानंतर त्यांनी किशोर अय्यर या बनावट नावाने दक्षिण गोव्यातील कोलवा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी पुरावा दिला. (Opposition to love marriage Child commits suicide in Goa Nashik News)

हेही वाचा: Nashik : मुंडेचा दणका; अधिकाऱ्यांनी घेतली आरोग्यकेंद्रांची झडती

३१ ऑक्टोबरला रात्री दोघांनी विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी गौरवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला व मुलीची तब्येत स्थिर असल्याचे कोलवा पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, घरच्यांचा लग्नाला प्रखर विरोध असल्याने आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे मुलीने पोलिसांना सांगितल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी गोवा येथील कोलवा पोलिस ठाण्यात नोंद केली असून, पुढील तपास कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक फिलोमेनो कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

हेही वाचा: Nashik : लाचखोरांची वाढतेय हाव ! शासकीय ITIच्या प्राचार्याला अटक