Nashik News : मालेगावात नागपूरची संत्री दाखल; घाऊक बाजारात दररोज 6 टन विक्री

Nazim Sheikh selling oranges in Satana Naka area.
Nazim Sheikh selling oranges in Satana Naka area.esaka
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : येथील बाजार समितीच्या मुख्य फळ बाजारात नागपूरची संत्री विक्रीसाठी दाखल झाली आहे. आठवड्यापासून शहर व परिसरातील प्रत्येक हातगाडीवर संत्रीची विक्री होतांना दिसत आहे. येथील घाऊक बाजारात रोज सहा टन संत्री विकली जाते. यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. किरकोळ बाजारात संत्री साठ रुपये किलो दराने विक्री होत आहे. वाढत्या थंडीमुळे संत्रीला काही प्रमाणात झळ बसली आहे. (oranges of Nagpur entered Malegaon Selling 6 tons per day in wholesale market Nashik Latest Marathi News)

येथील फळ बाजारात पेरू, सफरचंद, डाळिंब, अंजीर, संत्री विक्रीसाठी येत आहे. यावर्षी बाजारात सफरचंद व पेरूची आवक लक्षणीय होती. पेरूलाही चांगली मागणी वाढली होती. पेरू पाठोपाठ येथे नागपूरची गोड संत्री विक्रीसाठी दाखल झाली आहे. आठवड्यापासून येथे संत्रीची आवक वाढली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत नागपूरची संत्री येथे विक्रीसाठी येईल. परतीच्या पावसामुळे नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील संत्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संत्रीचे उत्पादनही घटले. थंडीमुळे संत्रीचे भाव स्थिर राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

सध्या थंडी वाढल्याने संत्रीच्या मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. मागच्या वर्षीही संत्रीचे भाव सारखेच होते. येथे संत्री नागपूर, अमरावती, वर्धा, परतवाडा, यवतमाळ या जिल्ह्यातून येते. संत्र्यांचा ८० टक्के माल शहरात तर वीस टक्के कसमादे परिसरात विक्रीला जातो.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून येथील फळ बाजारात पंजाबमधील संत्री विक्रीसाठी दाखल होणार आहे.

पंजाब येथील माल्टा व किन्नू या दोन प्रकारच्या संत्री येथे विक्रीसाठी असणार आहे. नागपूरच्या संत्रीपेक्षा या संत्रीला चांगली मागणी व भाव मिळणार आहे. किन्नू संत्रीला येथील घाऊक बाजारात सत्तर रुपये किलोप्रमाणे भाव मिळत असल्याचे अपना फ्रुट कंपनीचे संचालक रफिक शेख यांनी सांगितले.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Nazim Sheikh selling oranges in Satana Naka area.
Nashik News : नाशिक- बेळगाव विमानसेवा 3 फेब्रुवारीपासून सुरू; छगन भुजबळांच्या प्रयत्नांना यश

"संत्रीत भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी असते. संत्रीत जीवनसत्त्वे असतात. संत्री खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नेहमीच संत्रीचे सेवन करावे. संत्रे हे पोटॅशियममध्ये समृद्ध असतात. मानवी पेशी आणि शरीरातील द्रवपदार्थांचा एक महत्वाचा घटक, पोटॅशियम सोडियम क्रियांच्या सहाय्याने हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो."
- डॉ. मुग्धा भामरे, स्त्री रोगतज्ज्ञ, मालेगाव

"यावर्षी परतीच्या पावसामुळे संत्री पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने तुटपुंजी नुकसानभरपाई हेक्टरी २७ हजार रुपये दिले. त्या भरपाईतून शेती मशागत व फवारणीसाठी लागणारा खर्चही निघाला नाही. शासनाने नुकसानभरपाईची रक्कम वाढवावी."
- सुभाष बेहरे, संत्रा उत्पादक, मु. पो. शिरसगाव कसबा, जि. अमरावती

Nazim Sheikh selling oranges in Satana Naka area.
Nashik News : पोषण आहार अनुदान वाढले; आमचे कधी ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com