फ्रंट लाईन वर्कर्सना मिळेना बेड! अखेर पोलिस आयुक्तांनी घेतला पुढाकार

स्वतःचा जीव धोक्यात घालत फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटल्समध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे
Deepak Panday
Deepak Panday

नाशिक : सध्या देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या भयानक रुप घेतलेल्या कोरोना महामारीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालत फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटल्समध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनाच फ्रंट लाईन वर्करला बेड मिळावे यासाठी पुढाकार घ्यावा लागला आहे. आयुक्तांनी बेड्स राखीव ठेवावेत, असे स्पष्ट आदेश काढाले आहेत.



कोरोना महामारीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, होमगार्डस, आणि महापालिका कर्मचाऱ्यांना बेड्स आणि उपचारांसाठी रुग्णालयांकडून प्रतिसाद मिळणे तर दूरच साधे बेडही मिळत नसल्याने फ्रंटलाईन वर्करमध्ये नैराश्याची भावना आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढणारे कोरोनाचे रूग्ण आणि हॉस्पिटलची संख्या यांचे प्रमाण फारच व्यस्त असल्याचा फटका रूग्णांना बसतो. यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणारा पोलिस, होमगार्डस, महापालिका हे विभाग अपवाद नाहीत. गत वर्षापासून आतापर्यंत शहर पोलिस दलातील ६७१ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. सद्यस्थितीत १६० पोलिस अधिकारी व कर्मचारी बाधित असून, ११ पोलिस कर्मचाऱ्यांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झालेला आहे.

Deepak Panday
संतापजनक प्रकार! जात पंचायतने महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा..



वाढत्या कोरोना रूग्णांमुळे फ्रंटलाईन वर्कसलाही बेड्स मिळत नाही याचा थेट परिणाम संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर होतो. कुटुंबियाना बेड्स आणि उपचार मिळण्याची शाश्वती असल्यास फ्रंटलाईन वर्कर प्राधन्याने कर्तव्य बजावतील. त्यामुळे हे आदेश काढण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. हा आदेश सरकारी तसेच खासगी रूग्णालयांना बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती शहरातील हॉस्पिटल्स प्रशासनाला लेखी स्वरूपात देण्याची जबाबदारी पोलिस ठाण्यांसह महापालिका प्रशासनाकडे सोपविली आहे.

Deepak Panday
धक्कादायक प्रकार! एमआयडीसी, अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्याकडून ऑक्सिजनची पळवापळवी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com