esakal | कदाचित अनर्थ टळला असता; महिन्यापूर्वीच स्ट्रक्चरल ऑडिट झाले असते तर..!

बोलून बातमी शोधा

audit
कदाचित अनर्थ टळला असता; महिन्यापूर्वीच स्ट्रक्चरल ऑडिट झाले असते तर..!
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोविड सेंटरमध्ये दुर्घटना घडू नये म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयासह नवीन बिटको रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हेच आदेश महिनाभरापूर्वी दिले असते, तर ही दुर्घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे आदेश

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने कोविड सेंटर वाढविले आहे. कोविड सेंटरमध्ये दुर्घटना घडू नये म्हणून आयुक्त जाधव यांनी महापालिकेच्या नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालय व कथडा भागातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, तपोवनातील सिंहस्थ रुग्णालय, नाशिक-पुणे रोडवरील समाजकल्याण वसतिगृहाची इमारत, मेरी येथील वसतिगृह, राजे संभाजी स्टेडियम, त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम, मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या कोविड केअर सेंटरचे स्ट्रक्चरल ऑडिट, तसेच फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी दिले आहेत. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागार संस्था म्हणून सिव्हिल टेक, नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर ॲड. बाबूराव गणपत ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, प्राचार्य, संदीप पॉलिटेक्निक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा: धडपड, आक्रोश अन्‌ हुंदक्‍यांनी नाशिक सुन्न! रुग्णालयात अंगावर काटा आणणारे दृश्‍य

तर आजची दुर्घटना टळली असती,

इलेक्ट्रिकल ऑडिटकरिता मे. मेडा इन पॅनल एनर्जी ऑडिटर, पुणे, मे. बी. ई. ई. स्टीफाईड एनर्जी ऑडिटर, दिल्ली, विद्युत निरीक्षक, नाशिक यांची, तर फायर ऑडिटकरिता मे. अथर्व एन्टरप्रायझेस, नाशिक, मे. लाइफलाइन सर्व्हिसेस नगर, मे. बालाजी फायर सर्व्हिस, नाशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २५ एप्रिलपर्यंत ऑडिटचा अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. हेच ऑडिट अगोदर झाले असते, तर आजची दुर्घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.