क्यूआर कोड स्‍कॅन करून भरा अवयवदानाचे प्रतिज्ञापत्र

organ donation gives life to both
organ donation gives life to bothesakal

नाशिक : कोरोना महामारीच्‍या (Corona pandemic) कालावधीत अवयवदान मोहिमेला खीळ बसली आहे, तर जनजागृतीवरही मर्यादा येत आहेत. त्यातच अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासह सुलभरीत्‍या प्रतिज्ञापत्र (Pledge form) भरण्यासाठी ‘झेडटीसीसी’च्‍या (ZTCC) पुणे विभागाने अनोखी शक्‍कल लढविली आहे. यासंदर्भात क्यूआर कोड (QR-code) विकसित केला असून, प्रतिज्ञापत्र भरणे सुलभ झाले आहे. सोबत संबंधितांना नोंदणीकृत ई-मेलवर ‘युनिक नंबर’ पाठविण्याची सुविधाही विकसित केली आहे. (organ-donation-registration-using-QR-code-nashik-marathi-news)

देशातील हा दुसरा प्रयोग

यापूर्वी २०१९ मध्ये दिल्‍लीतील एम्‍स रुग्‍णालयातर्फे अशाच प्रकारे क्‍यूआर कोड विकसित करण्यात आला होता. यानंतर देशातील हा दुसरा प्रयोग आहे. तर अशा स्‍वरूपातील क्‍यूआर कोड विकसित करणारी झेडटीसीसी, पुणे ही पहिली स्‍वयंसेवी संस्‍था ठरली आहे. गुरुवारी (ता. १७) या क्‍यूआर कोडचे अनावरण केले असून, संकेतस्‍थळ व अन्‍य समाजमाध्यमांतून नागरिकांना हा कोड उपलब्‍ध करून दिला आहे.

यापूर्वीच्‍या प्रचलित पद्धतीनुसार एकतर छापील स्‍वरूपातील अर्ज भरून किंवा ऑनलाइन स्‍वरूपात संकेतस्‍थळावर फॉर्म भरून अवयवदानासाठी प्रतिज्ञापत्र भरता यायचे. ऑनलाइन फॉर्म भरताना लिंक सापडणे, फॉर्म भरणे ही तांत्रिकदृष्ट्या किचकट प्रक्रिया वाटायची. त्‍यातच कोरोना महामारीच्‍या (Corona virus) काळात जनजागृती मोहीमदेखील प्रभावित झाली. अशात संस्‍थेतर्फे क्‍यूआर कोड विकसित केला आहे. हा कोड स्‍कॅन करताच थेट प्रतिज्ञापत्र भरण्यासाठीची लिंक खुली होते.

organ donation gives life to both
निर्बंध कायम राहून दुकानांप्रमाणे मॉलला परवानगी?

ई-मेलद्वारे मिळेल डोनर कार्ड, युनिक नंबर

क्‍यूआर कोडद्वारे प्रतिज्ञापत्र भरल्‍यानंतर पुढील काही मिनिटांत संबंधितांना त्‍यांच्‍या नोंदणीकृत ई-मेलवर डोनर कार्ड पाठविण्याची सुविधा केली आहे. यासोबतच युनिक नंबरही जारी केला जाणार आहे. कार्ड हरविल्‍यास या युनिक नंबरच्‍या सहाय्याने पुन्‍हा कार्ड प्राप्त करून घेता येईल. पंधरा दिवसांपासून क्‍यूआर कोड विकसित करण्याची प्रक्रिया सुरू होती.

organ donation gives life to both
वृक्षतोड प्रकरण मिटवून घ्या म्हणणारी ‘ती’ नगरसेविका कोण?

''क्‍यूआर कोडसोबत आम्‍ही प्रतिज्ञापत्र भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. अगदी दोन मिनिटांत अर्ज भरून पुढील दोन मिनिटांत ई-मेलद्वारे डोनर कार्ड उपलब्‍ध करणे शक्‍य झाले आहे. अवयवदानाची इच्‍छा असलेल्‍या व्‍यक्‍तींना या सुविधेचा फायदा होऊन अधिकाधिक लोक अवयवदानाचा संकल्‍प करतील, अशी अपेक्षा आहे.'' -आरती गोखले, सेंट्रल काॅर्डिनेटर, झेडटीसीसी, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com