NMC News : होर्डिंगधारकांचा महापालिकेला ठेंगा; अवघ्या 13 होर्डिंगचे प्रमाणपत्र

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

Nashik News : शहरामध्ये उभारण्यात आलेले जाहिरात फलक व आकाश चिन्हांच्या मजबुती किंवा कार्यक्षमता तपासणी प्रमाणपत्र बंधनकारक असताना जवळपास साडेआठशेपैकी अवघ्या तेरा होर्डिंग्जचे प्रमाणपत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे.

जवळपास ८३२ होर्डिंगधारकांनी महापालिकेला ठेंगा दाखविला आहे. (Out of nearly 850 only 13 hoardings were certified by Municipal Corporation nashik news)

आतापर्यंत होर्डिंगधारकांना पाठीशी घालणाऱ्या विविध कर विभागावरच पलटवार झाला आहे. होर्डिंगधारकांच्या या मुजोरगिरीला उत्तर म्हणून ८३२ जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, पंधरा दिवसात प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र दुसरीकडे होर्डिंगधारकांची मजुरी का वाढली, या प्रश्नाकडे मात्र काणाडोळा केला जात आहे.

एप्रिल महिन्यात पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील महामार्गावरील रस्त्यालगत अनधिकृत होर्डिंग कोसळून अपघात झाला. यात पाच जणांचा मृत्यू, तर तीन गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे राज्य शासनाने तातडीने महापालिका हद्दीत उभ्या असलेल्या आकाश चिन्ह, जाहिरात फलकांची कार्यक्षमता तपासून मजबुती करण्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या सूचना महापालिकांना दिल्या होत्या.

सदर आदेश मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झाले. त्यानंतर महापालिकेच्या विविध कर विभागाकडून संबंधितांना नोटिसादेखील पाठविण्यात आल्या. परंतु अवघ्या १३ होर्डिंगधारकांनी कार्यक्षमता व मजबुतीकरण प्रमाणपत्र महापालिकेला सादर केले आहे. संदीप फाउंडेशन व मराठा विद्या प्रसारक संस्थेकडे कार्यक्षमता तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
NMC Water bill : पाणीपट्टी देयक वाटपाची वाटचाल खासगीकरणाकडे

शहरामध्ये जवळपास ८४५ होर्डिंग आहे, त्यातील बहुतांश होर्डिंग हे गरजेच्या ठिकाणी आहे. होर्डिंग उभारल्यानंतर दरवर्षी स्ट्रक्चर ऑडिट करून महापालिकेला प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु नाशिक महापालिकेत असा कुठलाच प्रकार नसल्याची बाब समोर आली आहे. आता पुणे येथील दुर्घटनेनंतर राज्य शासनाने पत्र पाठवूनही त्याची दखल घेतली जात नाही.

"होर्डिंगधारकांना व्हिटेबिलिटी सर्टिफिकेट सादर करण्याच्या सूचना दिल्या असून मदतीच्या कालावधीमध्ये सर्टिफिकेट साधारण झाल्यास होर्डिंग पाडण्याची कारवाई केली जाणार आहे." - श्रीकांत पवार, उपायुक्त, विविध कर विभाग, महापालिका.

अशी आहे जाहिरात फलक मजबुतीकरण स्थिती

विभाग एकूण नोटिसा महापालिकेला प्राप्त अहवाल

पश्चिम ३१३ ०६
पूर्व १९२ ००
पंचवटी ९७ ००
नाशिक रोड। ९९ ००
सिडको ७४ ०७
सातपूर ७० ००
एकूण ८४५ १३

NMC Nashik News
Nashik News: जिल्ह्यातील सर्व उद्योग २ जूनला बंद; उद्योजकांच्या बैठकीत एकमुखी निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com