Nashik News: संकटांवर मात करत शेतकरी लागले कामाला; कसबेसुकेणेत द्राक्षबागांत एप्रिल खरड छाटणीस सुरवात

A farmer spraying pesticides in a vineyard.
A farmer spraying pesticides in a vineyard.esakal

Nashik News : परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक संकटांवर मात करत पुढील द्राक्ष उत्पादनाच्या दृष्टीने एप्रिलची खरड छाटणी सुरू केली आहे.

मागची दुःखं विसरून ते पुन्हा एकदा नवीन हंगामासाठी जोमाने तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. (Overcoming crisis farmers started working Beginning of April rough pruning in Kasbesukene vineyards Nashik News)

यंदाचा द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने फारच वाईट गेला. सुरवातीचा काही काळ सोडल्यास नंतरच्या काळातील द्राक्ष उत्पादन चांगले असले, तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे व ठराविक अंतराने पडलेला बेमोसमी पाऊस, गारपीट यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला.

एका बाजूला द्राक्ष उत्पादनाचा प्रचंड खर्च, तर दुसऱ्या बाजूला अल्प दरात विकले गेलेले द्राक्ष, यामुळे डोक्यावर प्रचंड कर्जाचे ओझे असताना हातावर हात धरून बसणे बळीराजाला शक्य नाही.

पुढील वर्ष तरी चांगले येईल, निसर्गाची साथ मिळेल, मायबाप सरकार शेतकरी हिताचा विचार करेल या आशेवर पुढील वर्षाच्या द्राक्ष उत्पादनासाठी आत्तापासूनच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

A farmer spraying pesticides in a vineyard.
Nashik News : महापालिकेच्या अंतिम अंदाजपत्रकास मंजुरी; करवाढ नाही

द्राक्ष बागेच्या खरड छाटणीपासून ते द्राक्ष हंगाम संपेपर्यंत मजुरीचा दर काय ठरेल, हे निश्‍चित सांगता येत नाही. रासायनिक खते, विद्राव्य खते, शेणखत व कीटक नाशकांचा खर्च करताना शेतकऱ्यांना सारासार विचार करावा लागणार आहे.

"यंदाचा द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांना फारसा चांगला गेला नाही. बहुतांश द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली; परंतु पुढील हंगाम चांगला जाईल, या आशेवर पुन्हा बळीराजा द्राक्ष हंगामासाठी सज्ज होत आहे."

- रामेश्‍वर काठे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कसबे सुकेणे

A farmer spraying pesticides in a vineyard.
Unseasonal Rain : सोने गहाण ठेवुन पिकविलेल्या कांद्याची नासाडी; आवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com