esakal | भविष्यात खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन प्लांट बंधनकारक

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन प्लांट

भविष्यात खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन प्लांट बंधनकारक

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (corona virus second wave) ऑक्सिजनचा (oxygen) तुटवडा मोठ्या प्रमाणात भासल्याने अनेक रुग्णांना घरीच उपचार करण्याची वेळ आली. अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी प्राण गमवावे लागले. त्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी खासगी रुग्णालयांना (private hospital) देखील आता ऑक्सिजन (oxygen) प्लांट बसविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Oxygen plant binding compulsory to private hospitals)

मुबलक ऑक्सिजन हि काळजी गरज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता भासली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुणे येथून कराराप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा झाला. खासगी रुग्णालयांना मात्र मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागले. शहर व ग्रामीण भाग मिळून ११२ टन ऑक्सिनची आवश्‍यकता असताना अवघा ८५ टन ऑक्सिजन पुरवठा झाल्याने यावरून ऑक्सिजनची परिस्थिती किती भयानक आहे, ही बाब लक्षात येते. अनेक रुग्णालयांना नियमित पुरवठा न झाल्याने रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण दाखल करून घेतले जाणार नसल्याचे फलक लावण्यात आले. गेल्या आठवड्यात शहरातील सहा खासगी रुग्णालयांमध्ये तर ऑक्सिजन संपुष्टात येत असल्याने रुग्णांना इतरत्र हलविण्याच्या सूचना देण्यात आल्याने शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यादृष्टीने महापालिकेने स्वखर्चाने ऑक्सिजन प्लांट बसविण्याची तयारी करताना खासगी कोविड सेंटर चालविणाऱ्या तेथील प्रशासनाला रुग्णालयाची ऑक्सिजनची गरज भागविता येईल एवढ्या क्षमतेचे प्लांट बसविणे बंधनकारक केले जाणार आहे. त्या संदर्भात येत्या आठ दिवसांमध्ये सूचना काढल्या जाणार आहेत. शहरातील सुमारे १७१ खासगी कोविड सेंटरला तशा सूचना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

हेही वाचा: 18 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या

असे असेल ऑक्सिजन प्लांटचे नियोजन

एक ते ५० बेडच्या रुग्णालयासाठी सहा किलोलिटर क्षमतेचा प्लांट बसविणे बंधनकारक राहणार आहे. ५१ ते १०० बेडसाठी दहा किलोलिटर, १०१ ते २०० बेडसाठी २० किलोलिटर, तर दोनशे बेडपेक्षा अधिक रुग्णालयांसाठी ३० किलोलिटर क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट बसविणे बंधनकारक केले जाणार आहे.

हेही वाचा: जिल्हाबंदीचे तीन तेरा आणि 'सकाळ'च्या दणक्यानंतर यंत्रणा अलर्ट!