esakal | जिल्हाबंदीचे तीन तेरा आणि 'सकाळ'च्या दणक्यानंतर यंत्रणा अलर्ट!

बोलून बातमी शोधा

जिल्हाबंदीचे तीन तेरा आणि 'सकाळ'च्या दणक्यानंतर यंत्रणा अलर्ट!
जिल्हाबंदीचे तीन तेरा आणि 'सकाळ'च्या दणक्यानंतर यंत्रणा अलर्ट!
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : ‘जिल्हाबंदीचे वाजलेत तीन तेरा’ या आशयाचे वृत्त सोमवारी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यावर अखेर पोलिस यंत्रणेला जाग आल्याचे चित्र पुणे-नाशिक महामार्गासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे ‘अलर्ट’ झाल्यागत सीमेवरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असल्याचे दृश्‍य ‘सकाळ’च्या बातमीदारांना बघावयास मिळाले.

हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : जिल्हाबंदीचे वाजलेत तीन तेरा; पाहा VIDEO

कुठे चालले, काम काय आहे?

करे घाटामध्ये लोखंडी जाळ्या लावून तंबूत एकच पोलिस असल्याचे चित्र रविवारी (ता. २) दुपारी दिसून आले होते. सोमवारी (ता. ३) पुन्हा त्याच वेळी ‘सकाळ’च्या बातमीदाराच्या ‘ग्राउंड रिपोर्ट’मध्ये कुठून आले, कुठे चालले, काम काय आहे, अशी विचारणा करून पोलिस त्याबद्दलच्या नोंदी ठेवत असल्याचे आढळले.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍युकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

'सकाळ'च्या दणक्यानंतर यंत्रणा अलर्ट!

मुंबईकडून येणाऱ्या वाहनांची मुंबई-आग्रा महामार्गावरील तपासणी अधिक कडक करण्यात आली खरी, पण इथल्या पोलिसांच्या सुविधांचा यंत्रणेने फारसा गांभीर्याने विचार केल्याचे चित्र ‘सकाळ’च्या बातमीदाराला आढळले नाही. हे कमी काय म्हणून येथे ‘ड्यूटी’ असलेले आरोग्य कर्मचारी आणि शिक्षकांना सोमवारीही थांबावे असे वाटले नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखायचा कसा, असा प्रश्‍न घाटनदेवी परिसरातील तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या पोलिसांना पडला होता. येवल्याच्या गमती आणखी निराळ्या पद्धतीने सोमवारच्या ‘ग्राउंड रिपोर्ट’वेळी पाहायला मिळाल्या. लोकप्रतिनिधींची नावे सांगून बिनधास्त हिंडणाऱ्यांना अडवायचे कसे, असा प्रश्‍न पोलिसांना भेडसावत होता. त्याची दखल अर्थात, पालकमंत्री छगन भुजबळ कसे घेणार आणि आपल्या मतदारसंघातील सीमाभागात कडक तपासणीचे फर्मान कधी सोडणार, याकडे येवलावासीयांचे लक्ष लागले आहे.