esakal | मालेगावला उभारणार ऑक्सिजन प्लांट; खासदार भामरेंकडून ५० लाखांचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

 Malegaon General Hospital

मालेगावला उभारणार ऑक्सिजन प्लांट; खासदार भामरेंकडून ५० लाखांचा निधी

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढतानाच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. येथील सामान्य रुग्णालयाला स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी त्यांच्या खासदार निधीतील ५० लाखांचा निधी रुग्णालयास दिला आहे. डॉ. भामरे यांनी निधीसंदर्भातील पत्र वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्याकडे सुपूर्द केले.

मालेगावच्या सामान्य रुग्णालयात शहरासह कसमादे भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. सामान्य रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित झाल्यास कोविड रुग्णांसह इतरही गंभीर रुग्णांना दिलासा मिळेल. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये, एकाही रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होऊ, नये यासाठी डॉ. भामरे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे. लवकरच ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला सोपविला जाईल. यानंतर सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. या वेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, देवा पाटील, लकी गिल, नीलेश कचवे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

loading image