esakal | रेमडेसिव्हिरपाठोपाठ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचाही तुटवडा! काही रुग्णांना अन्यत्र हलविले

बोलून बातमी शोधा

Oxygen shortages in hospitals followed by remdesivir injection Nashhik Marathi news

कोरोना संसर्गामुळे रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढत असताना सर्वसाधारण खाटांसह ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेडही मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा झाल्याचा प्रकार समोर आला. त्यापाठोपाठ आता रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कमी पडत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे.

रेमडेसिव्हिरपाठोपाठ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचाही तुटवडा! काही रुग्णांना अन्यत्र हलविले
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्गामुळे रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढत असताना सर्वसाधारण खाटांसह ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेडही मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा झाल्याचा प्रकार समोर आला. त्यापाठोपाठ आता रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कमी पडत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील सुविचार हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (ता. ८) सकाळी काही रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने अन्य रुग्णालयांत हलविण्यात आले. 

शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनारुग्ण आढळत असल्याने महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयांमधील खाटा भरल्या आहेत. शहरात पाच हजारांहून अधिक कोरोना बेड उपलब्ध आहेत, तर त्यापैकी दीड हजार ऑक्सिजन बेड आहेत. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बेडची गरज भासत असल्याने त्याप्रमाणे तुटवडादेखील निर्माण झाल्याच्या तक्रारी होत्या. परंतु आतापर्यंत कुठल्याच रुग्णालयाकडून दुजोरा दिला गेला नाही. गुरुवारी सकाळी नाशिक- पुणे महामार्गावरील सुविचार हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब समोर आली. रुग्णालय प्रशासनानेदेखील यास दुजोरा दिला. रुग्णालयाचे डॉ. श्‍याम पाटील म्हणाले, की रुग्णालयासाठी सध्या रोज अडीचशे किलोलिटरचे एक असे सहा ड्युरासेल लागतात. परंतु गुरुवारी पिनॅकल एजन्सीकडून अवघे दोन ड्युरासेल प्राप्त झाल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासला. एका रुग्णाला मानवता क्युरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना अन्यत्र हलविण्यात येत आहे. सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही. मात्र, शहरात मुबलक साठा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात झाला हे खरे असले तरी सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. हॉस्पिटल प्रशासनाकडून ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच रुग्णांच्या नातेवाइकांनी गाजावाजा केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली. 
- डॉ. श्याम पाटील, संचालक, सुविचार हॉस्पिटल 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश