esakal | नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती; रुग्णांना इतरत्र हलवले

बोलून बातमी शोधा

zakir hussain hospital Nashik
नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती; रुग्णांना इतरत्र हलवले
sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : येथील महानगरपालिकेचे डॉ. झाकीर हुसेन कोविड सेंटरमधील ऑक्सिजनच्य टाकीतूव ऑक्सिजन गळती सुरू होती, यामुळे अनेक कोरोना रुग्णांना इतरत्र हलविले आहेत. दरम्यान ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगवले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापालिकेच्या या रुग्णालयात 171 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत तर 67 रुग्ण हे व्हेंटिलेटर असून या घटनेमध्ये काही रुग्ण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑक्सिजन गळतीमुळे रुग्णालयातील रुग्णांना ऑटो रिक्षा इतर वाहनांमधून दुसरीकडे हलवण्यात आले टाकीतून ऑक्सिजन परिसरात बऱ्याच अंतरापर्यंत ऑक्सिजन पसरला होता. दरम्यान घटनेनंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मागच्या काही दिवसांंपूर्वीच रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसवण्यात आली आहे.

img

oxygen leak