Dense Fog Causes Flight Delays at Nashik Ozar Airport : नाशिकच्या ओझर विमानतळावर सकाळच्या वेळी दाट धुके पसरलेले असून त्याचा परिणाम विमानसेवांवर होत आहे; दिल्लीहून येणाऱ्या विमानाला उशीर झाला.
नाशिक: ओझर विमानतळावर मागील दोन दिवसांपासून सकाळच्या वेळेत पडणाऱ्या दाट धुक्यामुळे विमान सेवांना विलंब होत आहे. शुक्रवारी (ता. ७) देखील नवी दिल्लीहून येणाऱ्या विमानाला विलंब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.