ओझर: केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत ओझर नगर परिषद हद्दीतील ४० हजार टन साठविलेल्या कचरा बायोमायनिंगसाठी सुमारे सव्वादोन कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.