Agriculture department action against illegal pesticide sale in Ozar : ओझर (ता. निफाड) येथे कृषी विभागाने परवानगीशिवाय विकल्या जाणाऱ्या कीटकनाशक व जैवउत्तेजकांवर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला.
नाशिक: विनापरवानागी कीटकनाशके व जैवउत्तेजक विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाने ओझर (ता. निफाड) पोलिस ठाण्यात विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित गोविंद भामरे यांच्यासह तिघांकडून एक लाख ६९ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.